Wednesday, 1 June 2016

PowerPoint presentations कसे बनवावे

1) प्र थम MS Office ओपन करुन power point ओपन करा 2) तुम्हाला एक पांढरी स्लाईड दिसेल .स्लाईड डिझाइनचि हवी असल्यास स्क्रीनवर Design या option वर क्लिक करा तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसतील त्यातील एक निवडा 3)स्लाईडवर 2 text box दिसतील.पहिल्या बाॅक्समध्ये तुमच्या स्लाईड शो चा विषय व दुसर्या बाॅक्समध्ये तुमचे नाव टाका 4) बाॅक्स नको असेल तर बाॅक्सच्या रेषेवर राईट क्लिक करुन कट करा 5)आता तुम्हाला स्लाईडवर फोटो टाकायचा असल्यास वरिल Insert वर क्लिक करा picture option दिसेल त्यावर क्लिक करा नंतर तुमचे फोटो जेथे असतील ते फोल्डर ओपन करुन फोटो सिलेक्ट करा व खाली insert क्लिक करा फोटो स्लाईडवर येईल 6)फोटोचे नाव किंवा विषय लिहिण्यासाठी वर insert ला क्लिक करा त्यात text box व word art सिलेक्ट करा व त्यात टाईप करा नंतर text box लेफ्ट की धरुन ठेऊन योग्य ठिकाणी सेट करा 7) आता आपण साऊंड देऊ आता डाव्या बाजूला स्लाईड नं 1 वर या आपण जे विषयाचे नाव लिहीले त्यावर क्लिक करा नंतर वर insert वर जाऊन sound वर क्लिक करा अथवा नावाखाली अॅरो वर क्लिक करा तेथे काही options येतील त्यातून 2 नंबरचे option निवडा त्यात अनेक प्रकार येतील त्यातून पाहिजे तो साऊंड निवडा व क्लिक करा अशा प्रकारे तुम्ही स्लाईडवर ज्या ज्या गोष्टी अॅड केल्या त्या प्रत्येकाला साऊंड इफेक्ट देऊ शकता 8) आता आपण अॅनिमेशन देऊ यासाठी पुन्हा स्लाईड एकवर जाऊन Text box सिलेक्ट करा नंतर वर Animations वर क्लिक करा त्याखाली डावीकडे Custom animation असे option दिसेल त्यावर क्लिक करा आता उजव्या बाजुला add efect असे option दिसेल त्यावर क्लिक करा त्यात 4 options येतिल त्यातील पहिले सिलेक्ट करा पुन्हा त्यात अनेक options दिसतील त्यातील हवे ते निवडा त्यातच खाली 3 options दिसतील start,Direction,speed यातील प्रत्येक सिलेक्ट करुन सेट करा.अशा प्रकारे प्रत्येक टेक्स्टला अॅनिमेशन द्या अशा प्रकारे अनेक स्लाईड तयार करा यानंतर आपण स्लाईडला Animation देऊ वर animation ला क्लिक केल्यावर तुम्हाला वर अनेक स्लाईड दिसतील त्यापैकी एक निवडा (जवळपास 60 आहेत)त्याच्याच शेजारी Transition sound व speed असे दोन options दिसतील त्या दोन्हीतील हवे ते transition निवडा त्याखालीच Apply to all असे option दिसेल त्याला क्लिक केल्यास सर्व स्लाईडला ते transition लागू होईल स्लाईडच्या उजव्या बाजूला खाली play असे option आहे त्याला क्लिक केल्यास आपण जी स्लाईड केली ती बघता येईल सरावाने आपण चांगल्या ppt बनवू शकता अशा प्रकारे आपण आपला स्लाईड शो (ppt) तयार करु शकता PPT तयार करण्याची सूत्रे पावरपॉइंट मधे इमेज कशी तयार करावी? PowerPoint PowerPoint मध्ये इमेज आपण दोन प्रकारे करू शकतो. येथे दिलेली पद्धत स्लाईडवरील ठराविक आकार सिलेक्ट करून त्याचे रुपांतर इमेजमध्ये कसे करावे याविषयी आहे. हवे ते आकार, टेक्स्ट सिलेक्ट करा. आकार अगोदर तयार केला नसल्यास Insert मेनूमधून Shapes Insert करून घ्या. या शेपवर Right click करा. Save As Picture ऑप्शन निवडा. फाईल सेव करण्याचे लोकेशन निवडा. File Name → योग्य फाईलला नाव द्या. Save as Type → PNG, GIF, JPEG, TIFF योग्य पर्याय निवडा. (for MORE Info) Save बटण क्लिक करा. सेव फाईलची लोकेशन निवडून इमेज पहा. या पद्धतीने कमी वेळात अधिक आकर्षक इमेज, बटण, आकार, आकृत्या तयार करता येतात. पावरपॉइंट : इमेज इफेक्ट Image, PowerPoint पावरपॉइंट हे इमेज इफेक्टसाठीही खूप उपयुक्त आहे. अगदी कमी वेळेत तुम्हाला चांगले परिणाम साधता येतात. आणि खूप युजरफ्रेंडलीही...! Picture Tools मध्ये Format या मेनूमध्ये अनेक उपयुक्त टूल्स व तयार इफेक्ट दिलेले आहेत. चित्र पाहिल्यास हे लक्षात येईल. टूल्सवर एक नजर आणि थोडक्यात स्पष्टीकरण.. ग्रुपटूल्सस्पष्टीकरण AdjustRemove Backgroundचित्राची पार्श्वभूमी (बॅकग्राउंड) काढून टाकणे CorrectionBrightness/Contrast Soften/Sharpen Colorचित्राचा रंग बदलणे Artistic Effectविविध कलायुक्त तयार इफेक्ट Compress Pictureचित्राचे Resolution कमी करणे. Change Pictureचित्राचे सर्व इफेक्ट कायम ठेऊन चित्र बदलणे. Reset Pictureचित्र पूर्वस्थितीत आणणे. Picture Style--चित्राचे विविध तयार स्टाईल्स. Picture Borderचित्राची बोर्डर सेटिंग्ज Picture Effectचित्रांचे थ्रीडी व इतर सेटिंग्ज Picture Layoutचित्र/ चित्रे सिलेक्ट - रुपांतर तयार आकर्षक layout मध्ये. ArrangeBring Forwardचित्र इतर चित्रांच्या/ ग्राफिक्सच्या पुढे आणणे. Send Backwardचित्र इतर चित्रांच्या/ ग्राफिक्सच्या मागे नेणे. Selection paneडायरेक्ट चित्र दिसणे बंद/चालू करणे. चित्र सिलेक्ट करणे. Alignचित्रांची मांडणी (खूप उपयुक्त) Groupचित्रांचे ग्रुपिंग करणे. Rotateचित्र ठराविक अंशात फिरवणे. SizeCropचित्र कातरणे / नको असलेला भाग काढून टाकणे. Widthचित्राची रुंदी Heightचित्राची उंची adjust करणे. विविध इफेक्ट व त्याची माहिती घेतल्यास लक्षात येईल की फोटोशॉपमधील बरेच काम सोप्या पद्धतीने आपण येथे करू शकतो. चित्र हे प्रेझेंटेशनमध्ये जसेच्या तसे वापरण्यापेक्षा त्याला आकर्षक इफेक्ट दिल्यास एकजिन्सीपणा वाढेल आणि मोहक कलाकृती तयार होईल. पहिले चित्र जसेच्या तसे वापरले. दुसरे Artistic Effect- Blur, तिसरे Color-Blue तर चौथे Artistic Effect- Pastel Smooth कमी वेळात चांगला, तयार तरीही खूप नयनलोभस परिणाम..!

No comments:

Post a Comment

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र १ ते ५ वर्गनिहाय गुण संकलन Excel sheet